काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि हडपसर-सातववाडी परिसरातील जनतेचा सेवक.
हीच आवड पुढे सामाजिक कार्य, युवक सक्षमीकरण आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्याची प्रेरणा बनली.
२००५ साली एन.एस.यू.आय. (NSUI) मार्फत माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले.
आजपर्यंत माझ्या कामगिरीतून मी समाजातील सर्व घटकांशी थेट संवाद साधण्याचा आणि त्यांची गरज समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
शैक्षणिक आणि वैयक्तिक पार्श्वभूमी
माझं बालपण आणि शिक्षण हडपसर, पुणे येथेच झालं.
मी एम.कॉम. पदवीधर असून, शिक्षणासोबत सामाजिक जाण आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर दिला आहे.
माझ्या कुटुंबाचा समाजसेवेचा वारसा असून, त्या पायावर उभं राहून मी स्थानिक पातळीवर विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.
पुरस्कार आणि सन्मान
हे पुरस्कार माझ्या समाजकार्यातील सातत्य, नेतृत्व आणि जनसंपर्क कौशल्याचं प्रतीक आहेत.
२०१२
युवा शोध पुरस्कार, पुणे
२०१६
शाहू-फुले-आंबेडकर विचार पुरस्कार
२०२१
भारतरत्न फुले युवक समाजरत्न पुरस्कार
🌱 सामाजिक कार्य
सन २००७ हडपसर ससाणे नगर मधील युवकांना एकत्र करून साई युवा प्रतिष्ठान (ट्रस्ट) नावाची संस्था स्थापन केली.
संस्थेच्या माध्यमा तून वृक्षारोपण करणे, रक्तदान शिबिरे घेणे, स्वच्छता अभियान राबवणे, मतदार जनजागृती करणे, डोळ्यांची तपासणी व मोफत ऑपरेशन करणे, ज्येष्ठ नागरिक मदत केंद्र उभारणे, रोजगार मेळावा घेणे, व्यसनमुक्ती अभियान राबवणे, कोजागिरी करणे, अशा संस्थेच्या माध्यमातून आम्ही समाजोपयोगी कार्यक्रम घेतले आहेत..
🎓 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
🩺 आरोग्य तपासणी शिबिरे
🌱 पर्यावरण संवर्धन मोहिमा
🩸 रक्तदान शिबिरे
🏆 क्रीडा स्पर्धा
डोळ्यांची तपासणी व मोफत ऑपरेशन करणे, ज्येष्ठ नागरिक मदत केंद्र उभारणे
वृक्षारोपण करणे
व्यवसाय आणि कार्यक्षेत्र
शिक्षण आणि फिटनेस या दोन क्षेत्रांत मी उद्योजक म्हणून काम करतो.
या दोन्ही माध्यमांतून समाजातील युवकांना शिक्षण आणि आरोग्याच्या दिशेने प्रोत्साहन देणं हे माझं ध्येय आहे.
“डांगमाळी क्लासेस”
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, मार्गदर्शन आणि करिअरची दिशा देणारी संस्था.
“डांगमाळी क्लासेस”
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, मार्गदर्शन आणि करिअरची दिशा देणारी संस्था.
“डांगमाळी फिटनेस सेंटर”
युवकांमध्ये आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वास वाढविण्याचं केंद्र.
ध्येय आणि समाजदृष्टी
“शिक्षण, आरोग्यआणिसमानसंधी — हाचखराविकास.”
माझं उद्दिष्ट म्हणजे
हडपसर आणि सातववाडी परिसरातील प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाच्या संधी पोहोचवणे,
युवकांना रोजगारक्षम बनवणे आणि सामाजिक ऐक्य दृढ करणे.
माझं ध्येय आहे
राजकारण माझ्यासाठी सत्तेचं साधन नसून सेवेचं माध्यम आहे.
हडपसरला एक प्रगत, सुशिक्षित आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम भाग बनवणे.
आपला सहकार्य हेच माझं बळ
आपल्या विश्वासावर उभं राहून समाजासाठी कार्य करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न पुढेही सुरू राहील.
चला, एकत्र येऊन आपल्या हडपसर-सातववाडीचा विकास घडवूया!